रघुनंदन आले आले
रघुनंदन आले आले, धरणी माता कानी बोले
शिरीष कुसुमाहुनीही कोमल, कोमेजुन ती काया जाईल
सप्तस्वर्ग तो लवुनी खाली, धरुनि चालला छ्त्र साउली
रविचा रथ हळूहळू चाले
वृक्षलतांनो हृदय फुलांच्या, चरणाखाली रघुरायाच्या
पायघड्या या लवकरी घाला, माझ्यासाठी सांगा त्याला
शिळा अहिल्या हो झाले
पाऊलातली धूळ होउनी, बसली होती ती संजीवनी
भाळी लावता होईन पावन, आणिक रामा तुझेच दर्शन
धन्य मी पतिता झाले

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |
अहल्या | - | ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला. |
पतिता | - | दुराचारी, दुर्वतनी. |
शिरीष | - | या झाडाची फुलं नाजूक असतात. |
संजीवनी | - | नवजीवन / मेलेला प्राणी जिवंत करणारी विद्या. |