A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रघुवीर आज घरी येणार

रघुवीर आज घरी येणार
कमलफुलांच्या पायघड्यावर कमलपदे पडणार

कमलांकित या शय्येवरती कमलनयन मिटणार

कमलेपरी मी बसून पदांशी कमलचरण चुरणार

कमलकळ्यांचे अधर प्रभूचे अधरांनी टिपणार
कमला - लक्ष्मी.

 

Print option will come back soon