A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राजा झाला गुलाम राणी

राणी आली घरी, राजा राज्य तुझे संपले !
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

छोट्या या संसारी, तू राजा मी राणी
राणी बसे सिंहासनी अन्‌ राजा भरतो पाणी
हुकुमाच्या राणीने राज्य तुझे जिंकिले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

दोघांच्या संसारी, तू फिफ्टी मी फिफ्टी
राणी करी आराम अन्‌ राजाची कंबख्ती
नावाच्या राजाचे राज्य किती चांगले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

राजाच्या संस्थानी राणीचा कंट्रोल
राणी नीजे खुशाल अन्‌ राजा फुंकी चूल
पंपून ये स्टोव्ह जरा, काम किती राहिले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

शिक्षा ही मिळते रे प्रेमाच्या फंदात
चुकलो मी गे पुरा या लग्‍नाच्या धंद्यात
लढाईला जरा कुठे तोंड आता लागले
राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.