A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राजा शिवछत्रपती

इन्द्र जिमि जम्भ पर,
बाडव सुअम्भ पर,
रावन सदम्भ पर,
रघुकुलराज है ॥

पौन बारिबाह पर,
सम्भु रतिनाह पर,
ज्यों सहस्रबाह पर,
रामद्विजराज है ॥

उदरात माउली
रयतेस साउली
गडकोट राउळी
शिवशंकर हा

मुक्तीची मंत्रणा
युक्तीची यंत्रणा
खल दुष्टदुर्जना
प्रलयंकर हा

संतांस रक्षितो
शत्रू निखंदतो
भावंडभावना
संस्थापितो

ऐसा युगेयुगे
स्मरणीय सर्वदा
माता-पिता-सखा
शिवभूप तो

दावा द्रुम दण्‍ड पर,
चीता मृग-झुण्‍ड पर,
'भूषन' बितुण्‍ड पर,
जैसे मृगराज है ॥

तेज तम अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
त्यों मलिच्छ बंस पर,
सेर सिवराज है ॥
जय भवानी, जय शिवाजी !
गीत - कवी भूषण, शिरीष गोपाळ देशपांडे
संगीत - अजय-अतुल
स्वर- अजय गोगावले
गीत प्रकार - मालिका गीत, प्रभो शिवाजीराजा, स्फूर्ती गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- राजा शिवछत्रपती, वाहिनी- स्टार प्रवाह.
कोट - तट, मजबूत भिंत.
खल - अधम, दुष्ट.
निखंदणे - निषेध करणे, निंदा करणे.
राऊळ - देऊळ.
टिप्पणी
'इन्द्र जिमि जम्भ पर' या कवी भूषण रचित कवनावरील संदर्भ लेखांसाठी याच संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या त्याच्या सादरीकरणाच्या दुव्यास भेट द्या.
स्वर लता मंगेशकर यांचा आहे व संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.