A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राजस सुकुमार मदनाचा

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥

कांसे सोनसळा पांघरे पांटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥

सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा ।
तुका ह्मणे जीवा धीर नाहीं ॥५॥
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
कस्तुरी - एक अतिशय सुगंधी द्रव्य.
कांस - कंबर.
पांटोळा - रेशमी वस्‍त्र.
वैजयंती - विष्णूच्या गळ्यातली काळी माळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.