राजसा घ्यावा गोविंद विडा
ही नव्या नवतीची खुडून कवळी पानं
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
ही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं
अन् डाव्या डोळ्यानं खुडून घातला नजर-काताचा हो खडा
राजसा घ्यावा गोविंद विडा
विडा घेउनी अलगद हाती
हात अदबीनं केला पुढती
हिरवा शालू हिरवी चोळी, भरला हिरवा चुडा
या विड्याचा रंग गुलाबी
धुंद करील ही नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी भरून आणला घडा
नाचनाचुनी होता दंग
अर्ध्या रात्री येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया शिणगाराचा सडा
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
ही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं
अन् डाव्या डोळ्यानं खुडून घातला नजर-काताचा हो खडा
राजसा घ्यावा गोविंद विडा
विडा घेउनी अलगद हाती
हात अदबीनं केला पुढती
हिरवा शालू हिरवी चोळी, भरला हिरवा चुडा
या विड्याचा रंग गुलाबी
धुंद करील ही नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी भरून आणला घडा
नाचनाचुनी होता दंग
अर्ध्या रात्री येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया शिणगाराचा सडा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | कृष्णा कल्ले, सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | केला इशारा जाता जाता |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
नवती | - | नवी पालवी. |