A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रामप्रहरी राम-गाथा

रामप्रहरी राम-गाथा रंगते ओठांवरी

या दिशांनी राघवाचे गीत हे साकारिले
पाखरांनी आवडीने सूर त्याचे प्राशिले
रामनामी फूल फुलते डोलती तरूवल्लरी

एकवचनी, एकपत्‍नी, एकबाणी जो सदा
जो प्रजेचे सौख्य पाही, दु:ख साही सर्वदा
तोचि विष्णू, तोचि शिवही, तोचि अपुला श्रीहरी
रामप्रहर - पहाट.
वल्लरी - वेल (वल्ली, वल्लिका).