A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रम्य अशा स्थानी

रम्य अशा स्थानी, रहावे रात्रंदिन फुलुनी!

मंजुळ घंटा सांज-सकाळी
गोकुळ गीतें गातील सगळी
हो‍उनी स्वप्‍नीं गौळण भोळी वहावे यमुनेचे पाणी!

रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते पहावे अनिमिष तें नयनी!

स्वैर पवन मग होईल विंझण
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
सृष्टीसखीची हो‍उनि मैत्रिण फिरावे गात गोड गाणी!
अनिमिष - एकटक / अवलोकन, दृष्टी.
उषा - पहाट.
विंझण - पंखा.