रानच्या पाखरा रे
रानच्या पाखरा रे उगीच भेट झाली
वाहत होते पाणी
झर्यात धुंद गाणी
फुलांत गंध होता, गंधात भेट न्हाली
प्रीतीची धुंद भाषा
लाविते गोड आशा
मोकळ्या आभाळाची तुला रे हाक आली
विरही उरे सूर
पाखरू गेले दूर
एकटी उभी येथे झुरत झाडाखाली
वाहत होते पाणी
झर्यात धुंद गाणी
फुलांत गंध होता, गंधात भेट न्हाली
प्रीतीची धुंद भाषा
लाविते गोड आशा
मोकळ्या आभाळाची तुला रे हाक आली
विरही उरे सूर
पाखरू गेले दूर
एकटी उभी येथे झुरत झाडाखाली
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Print option will come back soon