A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंध्रात पेरिली मी

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी

पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे
धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी

पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे
मातीत मातलेला आवेगही तुफानी

सोसून सोसवेना गात्री अलक्ष्य धारा
प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी

प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे
त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी
अलक्ष्य - अ-लक्ष्य, अदृष्य.
उन्माद - कैफ / झिंग / धुंदी.
रंध्र - छिद्र / व्यंग / उणीव.
सर्द - थंड- ओलसर / आर्द्र.

अक्षरलेखन - भालचंद्र लिमये

( 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. )

 

Print option will come back soon
Random song suggestion
  पं. जितेंद्र अभिषेकी