A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंग माझा तुला

रंग माझा तुला ! गंध माझा तुला !
बोल काहीतरी ! बोल माझ्या फुला !

सांग लाजूनही नाव आतातरी;
एक खोळंबले गीत माझ्या उरी;
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला !

वेळ जादूभरी, ही गुलाबी हवा !
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा !
भास झाला खरा ! ध्यास माझा खुळा !

आज माझीतुझी भेट झाली अशी :
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी.
सांग, सोडू कसा हात हातातला !
गीत - सुरेश भट
संगीत - यशवंत देव
स्वर- अरुण दाते
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.