A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगांत मिसळले रंग नवे

रंगांत मिसळले रंग नवे
साधले चित्र जे मला हवे !

चंद्रलोकीच्या शीतल धामी
तू आणिक मी, तू आणिक मी
भवती ग्रहांचे फिरती थवे !

त्यांची वीणा, माझे पैंजण
गीत तयांचे, माझे नर्तन
युगायुगांचे जुळती दुवे !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- आशा भोसले
चित्रपट - अबोली
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.