A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग प्रिये सांग प्रिये

सांग प्रिये सांग प्रिये, घन भरून आले
पैलतिरी या अवेळी मेघ आळवीले !

दशदिशा वादळी, अंतरी काजळी
संधिकाली या इथे अंधारून आले !

दाटले आज गगन, का तुझे सजल नयन?
पापणीत आसवांस गहिवरून आले !
गीत - वीणा चिटको
संगीत - वीणा चिटको
स्वर- रामदास कामत
राग / आधार राग - पूरिया धनाश्री
गीत प्रकार - ऋतू बरवा, भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.