A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगरेखा घेउनी मी

रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते
सावळे ते रूप नाथा लोचनी मी पाहते!

श्यामकांती पाहता ती आसवे ती दाटती
उर्मिलेच्या भावऊर्मी अंतरी हेलावती
अंतरीची आर्तता ती आज गीते छेडिते!

आपुल्या हो संगती ते राम आणि जानकी
प्रीतिने विरही परंतु एकटी मी मंचकी
आसवांची मालिका मी श्यामकंठी घालते!

आपुल्या मी दर्शनाला आज झाले पारखी
भेट होता आपुली ती जन्म होई सार्थकी
एक आशा मीलनाची लोचनी या जागते!