A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राणी तुझ्या नजरेने

राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली ग
ती जादू मनी प्रीतीला फुलवून गेली ग !

हसले तुझ्या नयनांत कसे धुंद चांदणे?
मदनाने ही किमया तुला दान केली ग !

झुरतात नभी तारका मुखचंद्र पाहुनी
रूपात तुझ्या चंचल झलक रंगलेली ग !

खोट्या रुसव्यात तुझ्या होकार खुशीचा नटला
माझ्यावरी इष्काने मेहेरबानी केली ग !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.