रात्र पश्चिमेला सरली
रात्र पश्चिमेला सरली भल्या या पहाटे
योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते
शुक्र चांदणे मावळले, विरती रम्य तारा
हरीण शावकांशी खेळे धुंद गंध वारा
फुलातून उमलत येती भक्तीभाव गीते
मृगापरी नयनीं असती आर्त ज्यात भाव
एक ध्यास एकच आस 'हरी' एक नाव
चिंतनात श्रीकृष्णाच्या एकरूप होते
सूर सूर कानीं पडतो स्वर्ग येई खाली
भक्तीच्या प्रवाही मीरा भिजून चिंब झाली
भक्त आणि परमेशाचे वेगळेच नाते
योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते
शुक्र चांदणे मावळले, विरती रम्य तारा
हरीण शावकांशी खेळे धुंद गंध वारा
फुलातून उमलत येती भक्तीभाव गीते
मृगापरी नयनीं असती आर्त ज्यात भाव
एक ध्यास एकच आस 'हरी' एक नाव
चिंतनात श्रीकृष्णाच्या एकरूप होते
सूर सूर कानीं पडतो स्वर्ग येई खाली
भक्तीच्या प्रवाही मीरा भिजून चिंब झाली
भक्त आणि परमेशाचे वेगळेच नाते
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी |
राग | - | तोडी |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, हे श्यामसुंदर |
शावक | - | मूल. |