A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रवि आला हो रवि आला

आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला
रवि आला हो रवि आला

झाडेपाने फुलवेली हो
थेंब दंवाचे ल्याली हो
प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला

कवाड-अंगण उजळावे
फुलासवे मन उमलावे
हसली सदने हसली वदने, तम विरुनी गेला

करू आरती तेजाची
तेजाची रविराजाची
मंगल ऐका मंगल देखा, मंगलमय बोला