रविकिरणांची झारी घेउनी
रविकिरणांची झारी घेउनी सकाळी
बाग शिंपितो सोनेरी, देव भाबडा माळी
वेगवेगळ्या जातीचे
रोप लाविता भाग्याचे
जैसे रोप तैसे फूल जन्म घेई वेळोवेळी
काही फुलं रंगीढंगी
गंध फेकिती सुगंधी
जन्मजात काही जाती मृत्यूच्या कपाळी
दाही दिशा रंगलेली
बाग ही जगावेगळी
रोज नवी येईजाई नवी नवी कुंदकळी
बाग शिंपितो सोनेरी, देव भाबडा माळी
वेगवेगळ्या जातीचे
रोप लाविता भाग्याचे
जैसे रोप तैसे फूल जन्म घेई वेळोवेळी
काही फुलं रंगीढंगी
गंध फेकिती सुगंधी
जन्मजात काही जाती मृत्यूच्या कपाळी
दाही दिशा रंगलेली
बाग ही जगावेगळी
रोज नवी येईजाई नवी नवी कुंदकळी
| गीत | - | रमेश अणावकर |
| संगीत | - | प्रभाकर भालेकर |
| स्वर | - | आशालता वाबगावकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| कुंद | - | एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशालता वाबगावकर