A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राया मला पावसात नेऊ नका

नाही कधी का तुम्हांस म्हटलं, दोष ना द्यावा फुका
अहो राया मला पावसात नेऊ नका!

लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठेही नाही निवारा
भिजली साडी भिजली चोळी
भवतील ओल्या चुका
अहो राया मला पावसात नेऊ नका!

खबूतरागत हसत बसू या
ऊबदारसं गोड बोलू या
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या
लावून घेऊ खिडक्या दारं
पाऊस होईल मुका
अहो राया मला पावसात नेऊ नका!