रे क्षणा थांब ना
ही वादळे हृदयातली देतो तुला, घेशील ना?
स्वप्ने खुळी डोळ्यांतली देतो तुला, घेशील ना?
ही पाखरे बघ चालली, क्षण घेउनी एकेक हा
रे क्षणा, थांब ना ! गाऊ दे एक गाणे पुन्हा
रे क्षणा, थांब ना !
ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले
कण वेचले नादावुनी काही तरीही राहिले
जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू
या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना?
रे क्षणा, थांब ना ! गाऊ दे एक गाणे पुन्हा
थांब ना !
बघ बोलते ना बोलताही अंतरी माया खुळी
चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी
देऊ किती, देऊ कसे? माझ्या खुणा, माझे ठसे !
सांग ना जपशील ना तू सर्व हा माझेपणा
रे क्षणा, थांब ना ! गाऊ दे एक गाणे पुन्हा
रे क्षणा, थांब ना ! थांब ना !

गीत | - | संदीप खरे, सलील कुलकर्णी |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | शंकर महादेवन |
चित्रपट | - | एकदा काय झालं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.