रिमझिम
रिमझिम चाले तनमन ओले
या प्रेमातून जीवन उमले
प्रीतीचा आधार जिवाला
श्रद्धा दे बळ त्या प्रीतीला
या बंधातून घरकुल फुलले
रिमझिम चाले रिमझिम चाले
या प्रेमातून जीवन उमले
प्रीतीचा आधार जिवाला
श्रद्धा दे बळ त्या प्रीतीला
या बंधातून घरकुल फुलले
रिमझिम चाले रिमझिम चाले
गीत | - | शंकर वैद्य |
संगीत | - | विकास भाटवडेकर |
स्वर | - | उमा गोखले, देवेंद्र चिटणीस |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- रिमझिम, वाहिनी- झी मराठी. |