रोग पिरतीचा जडला मशि
रोग पिरतीचा जडला मशि !
ग बाई, चारचौघांत सांगू कशी?
एक आला तुरेवाला
लाल कमरेला शेला
झोकनोक बघुनिया जीव थोडाथोडा झाला
त्याच्या रुबाबाला पडले फशी !
नाही दवा, नाही पाणी
तगमग जीवघेणी
जळातून काढलेल्या तडफड माशावाणी
राती आसवांनी भिजते उशी !
वय बारा वर चार
पाय कापे टाकताना अहो नवखळा नार
जिथे गांगरले कैक मुनी-ऋषी !
ग बाई, चारचौघांत सांगू कशी?
एक आला तुरेवाला
लाल कमरेला शेला
झोकनोक बघुनिया जीव थोडाथोडा झाला
त्याच्या रुबाबाला पडले फशी !
नाही दवा, नाही पाणी
तगमग जीवघेणी
जळातून काढलेल्या तडफड माशावाणी
राती आसवांनी भिजते उशी !
वय बारा वर चार
पाय कापे टाकताना अहो नवखळा नार
जिथे गांगरले कैक मुनी-ऋषी !
गीत | - | मीना बिडीकर |
संगीत | - | कुमारसेन गुप्ते |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | गावची इज्जत |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
नवखळा | - | नवीन. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.