A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफुलांनी दरवळणारा श्रावण मी

आकाश पावसाचे
ते रंग श्रावणाचे
ओथंबल्या क्षणांचे

हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी

रंगली फुगडी बाई रानात
वाजती पैंजण बाई तालात

फांदीवरला झोका उंच उंच ग झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी

पावसातले दिवस आपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऐकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी

अजुनीच त्या ठिकाणी
ती श्रावणओली गाणी
माझी-तुझी कहाणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.