A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रूपकैफी प्रत्ययांचा गलबला

रूपकैफी प्रत्ययांचा गलबला प्राणात झाला !
स्पर्शकल्लोळात माझा जन्‍म एकाकी बुडला !

कोरिली होतीस जी तू माझिया वक्षांत गीते,
आज आपोआप त्यांना कंठ आभाळी मिळाला !

हे पुन्हा माझे विरागी रक्त गंधाळून गेले..
लाल ओठांच्या पहाटे सूर्य दंशाचा निघाला !

कालच्या स्वप्‍नास आली आज सोन्याची झळाळी,
गाढ तेजाबी मिठीची लागुनी एकान्‍तज्वाला !

संपली येथेच माझी स्वप्‍नभूमीतील यात्रा !
माझिया हाती कुणाचा तोच गोरा हात आला !