रूप लोचनी हे पाहताना
रूप लोचनी हे पाहताना
जाण कशाची उरे नच आता
तव स्पर्शाची ओढ मनाला
तुजविण मन हे विषण्ण आता
मर्मबंध हा मम जडताना
प्रीतगंध का तव उमजेना
व्रत प्रेमाचे वश हे मजला
याचक मी अन् तू मम दाता
जाण कशाची उरे नच आता
तव स्पर्शाची ओढ मनाला
तुजविण मन हे विषण्ण आता
मर्मबंध हा मम जडताना
प्रीतगंध का तव उमजेना
व्रत प्रेमाचे वश हे मजला
याचक मी अन् तू मम दाता
गीत | - | क्षितिज झारपकर |
संगीत | - | अच्युत ठाकूर |
स्वर | - | शौनक अभिषेकी |
चित्रपट | - | मर्मबंध |
गीत प्रकार | - | चित्रगीत |