रुसला कान्हा
रुसला कान्हा, जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
का रुसला माझा, का रुसला?
रुसला कान्हा, बाई ग रुसला कान्हा
जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
घागर भरली, कुणि ना फोडी
झोंबुनी पदरा कोणी न ओढी
आळवुनी आणा, जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
मधुदान कुणा देऊ, कधि गोकुळी ये राणा
गुंजत ये कुणी मागत ना, कुंजी चुंबनांना
का रुसला माझा, का रुसला
रुसला कान्हा, बाई ग रुसला कान्हा
सखे ग, रुसला कान्हा
जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
का रुसला? रुसला कान्हा !
का रुसला माझा, का रुसला?
रुसला कान्हा, बाई ग रुसला कान्हा
जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
घागर भरली, कुणि ना फोडी
झोंबुनी पदरा कोणी न ओढी
आळवुनी आणा, जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
मधुदान कुणा देऊ, कधि गोकुळी ये राणा
गुंजत ये कुणी मागत ना, कुंजी चुंबनांना
का रुसला माझा, का रुसला
रुसला कान्हा, बाई ग रुसला कान्हा
सखे ग, रुसला कान्हा
जा जा ग, जा ना !
का रुसला? रुसला कान्हा !
गीत | - | वि. स. खांडेकर |
संगीत | - | दादा चांदेकर |
स्वर | - | वत्सला कुमठेकर |
चित्रपट | - | लग्न पहावं करून |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
Print option will come back soon