A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू नव्या जगाची आशा

तू नव्या जगाची आशा
जय जय हे भारत देशा !

तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी
मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्‍नांच्या खाणी
जय युगधैर्याच्या देशा
जय नवसूर्याच्या देशा

श्रमातुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद
घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद
जय हरितक्रांतीच्या देशा
जय विश्वशांतीच्या देशा

पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली
अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली
जय लोकशक्तीच्या देशा
जय दलितमुक्तीच्या देशा
उपनिषद - गुरुचरणांजवळ बसून मिळवलेले ज्ञान.