सात समुद्रापलिकडुनी तो
सात समुद्रापलिकडुनी तो विहंग आला येथे
खुशीत येउनी पिसे फुलविली
हळुच खुणेची शीळ घातली
ओझरते पाहियले नुसते आणिक जुळले नाते
विहंग आला येथे
त्या दिवशी मी मला विसरले
पीस होउनी हवेत तरले
स्वत:भोवती गरगर फिरले, मिटून गाढ नयनांते
विहंग आला येथे
मी न बोलता त्याला कळले
रहस्य मी जे मनात जपले
त्या दिवशी मी पाहियले जागेपणात स्वप्नाते
विहंग आला येथे
उगिच झुरते तेव्हापासून
उगिच पाहते क्षितिज न्याहळून
अन् एकान्ती राधा होऊन कुंजवनी मी जाते
विहंग आला येथे
खुशीत येउनी पिसे फुलविली
हळुच खुणेची शीळ घातली
ओझरते पाहियले नुसते आणिक जुळले नाते
विहंग आला येथे
त्या दिवशी मी मला विसरले
पीस होउनी हवेत तरले
स्वत:भोवती गरगर फिरले, मिटून गाढ नयनांते
विहंग आला येथे
मी न बोलता त्याला कळले
रहस्य मी जे मनात जपले
त्या दिवशी मी पाहियले जागेपणात स्वप्नाते
विहंग आला येथे
उगिच झुरते तेव्हापासून
उगिच पाहते क्षितिज न्याहळून
अन् एकान्ती राधा होऊन कुंजवनी मी जाते
विहंग आला येथे
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | किशोरी आमोणकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • आकाशवाणी संगीतिका 'बिल्हण' मधील पद. |
विहंग | - | विहग, पक्षी. |