A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सदैव सैनिका पुढेच जायचे

सदैव सैनिकापुढेच जायचे
न मागुती तुवाकधी फिरायचे
 
सदा तुझ्यापुढेउभी असे निशा
सदैव काजळीदिसायच्या दिशा
मधून मेघ हेनभास ग्रासती
मधेच या विजाभयाण हासती
दहा दिशांतुनीतुफान व्हायचे
सदैव सैनिकापुढेच जायचे
 
प्रलोभने तुलान लोभ दाविती
न मोहबंधनेपदांस बांधिती
विरोध क्रोध वातुला न थांबवी
न मोह भासतोगजान्‍त वैभवी
न दैन्यही तुझेकधी सरायचे
सदैव सैनिकापुढेच जायचे
 
वसंत वा शरद्‌तुला न ती क्षिती
नभात सूर्य वाअसो निशापती !
विशीर्ण वस्‍त्र होविदीर्ण पावले
तरी न पाय हेकधी विसावले !
न लोचनां तुवासुखे मिटायचे
सदैव सैनिकापुढेच जायचे
 
नभात सैनिकाप्रभात येउ दे
खगांसवे जगासुखात गाउ दे
फुलाफुलांवरीसुवर्ण शोभु दे
जगास शांततासुहास्य लाभु दे
न पाय तोवरीतुझे ठरायचे
सदैव सैनिकापुढेच जायचे
क्षिती - फिकीर.
खग - पक्षी.
गजान्‍तलक्ष्मी - दाराशी हत्ती झुलवण्याइतकी संपत्ती.
विदीर्ण - फाडलेले / भग्‍न.
विशीर्ण - जीर्ण.

 

  आकाशवाणी गायकवृंद, कुंदा बोकिल, दशरथ पुजारी