A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सहज तुझी हालचाल

सहज तुझी हालचाल
मंत्रें जणुं मोहिते.

सहज चालणेंहि तुझें,
सहज बोलणेंहि तुझें,
सहज पाहणेंहि तुझें
मोहनि मज घालितें.

संसृतिचा घोर भार
बघतां तूं एकवार
विलया सखि, जाय पार,
देहभान लोपतें.
गीत - भा. रा. तांबे
संगीत - पं. कुमार गंधर्व
स्वर- पं. कुमार गंधर्व
राग - भैरवी
गीत प्रकार - कविता
  
टीप -
• काव्य रचना- ३ एप्रिल१९२७, ग्वाल्हेर.
• 'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून.
संसृति - संसार.
संपूर्ण कविता

सहज तुझी हालचाल
मंत्रें जणुं मोहिते.

सहज चालणेंहि तुझें,
सहज बोलणेंहि तुझें,
सहज पाहणेंहि तुझें
मोहनि मज घालितें.

संसृतिचा घोर भार
बघतां तूं एकवार
विलया सखि, जाय पार,
देहभान लोपतें.

देवी, वनदेवि म्हणूं,
स्वप्‍न, भास काय म्हणूं?
प्रतिभा कीं भैरवि म्हणुं
मति माझी कुंठते.

एकवार चघ हासुन
डळमळेल सिंहासन !
तळमळतिल मनिं सुरगण !
हास्यास्तव खास ते

ही अपूर्व शक्ति सगुण
झाडितसे मम अंगण,
हे माझे भाग्य बघुन
जळफळतिल देव ते

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.