A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सहस्ररूपे तुम्ही सदाशीव

सहस्ररूपे तुम्ही सदाशीव, श्रवणाशी बैसला
सांगतो, परिसा शिवलीला

प्रसन्‍न हो मज हे वाग्देवी
व्यास महर्षे कृपा असावी
सुरस कथा ही सजीव व्हावी
श्रवणीचे सुख साध्य असावे, मना लोचनाला
सांगतो, परिसा शिवलीला

स्थळ काळासह व्यक्ती व्यक्ती
करोत नर्तन नयनांपुढती
कथेने उपजो मनात भक्ती
रवि प्रभेसम विस्तारावा, आशय शब्दांतला
सांगतो, परिसा शिवलीला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - यशवंत देव
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• नृत्यनाटिका 'शिवपार्वती' (१९६८) मधील पद.
परिसा - ऐकणे.
वागीश्वरी (वाग्देवी) - सरस्वती.