सैनिक माझे नाव
उभा पाठीशी सदैव माझ्या तेजोमय इतिहास
उभे पाठीशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्वास
उभे पाठीशी भगतसिंगजी, उभे गुरू गोविंद
उभा पाठीशी सुभाष योद्धा, गर्जतसे जयहिंद
या देशाचा मी संरक्षक,
भारत माझे गाव, सैनिक माझे नाव
मी न मराठी राजस्थानी
धर्म जाती मज हिंदुस्थानी
मायभूमीचा मी अभिमानी
या अभिमानी धर्मव्रतांचा अवघ्या अंतर्भाव
जननी माझी भारतमाता
या भूमीतच पिके वीरता
जन्ममृत्यूची मला न चिंता
देह विनाशी हा तर केवळ आत्म्याचा पेहेराव
जितेन आणि जगेन लोकी
रण क्रीडांगण माझ्या लेखी
खड्ग पडो की मुकुट मस्तकी
देशकार्य ते देवकार्य, मज अटळ अंतरी भाव
उरि निर्भयता नयनी अग्नी
उन्नत मस्तक करी शतघ्नी
उभा इथे मी असा निशिदिनी
बघू कोणता शत्रू करतो कुठुनी धीट उठाव
उभे पाठीशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्वास
उभे पाठीशी भगतसिंगजी, उभे गुरू गोविंद
उभा पाठीशी सुभाष योद्धा, गर्जतसे जयहिंद
या देशाचा मी संरक्षक,
भारत माझे गाव, सैनिक माझे नाव
मी न मराठी राजस्थानी
धर्म जाती मज हिंदुस्थानी
मायभूमीचा मी अभिमानी
या अभिमानी धर्मव्रतांचा अवघ्या अंतर्भाव
जननी माझी भारतमाता
या भूमीतच पिके वीरता
जन्ममृत्यूची मला न चिंता
देह विनाशी हा तर केवळ आत्म्याचा पेहेराव
जितेन आणि जगेन लोकी
रण क्रीडांगण माझ्या लेखी
खड्ग पडो की मुकुट मस्तकी
देशकार्य ते देवकार्य, मज अटळ अंतरी भाव
उरि निर्भयता नयनी अग्नी
उन्नत मस्तक करी शतघ्नी
उभा इथे मी असा निशिदिनी
बघू कोणता शत्रू करतो कुठुनी धीट उठाव
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | बाळ चिटणीस |
स्वर | - | महेंद्र कपूर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • ह्या ध्वनीफितीची सुरुवात अपूर्ण आहे. आपल्याकडे संपूर्ण ध्वनीफीत असल्यास कृपया संपर्क करा- aathavanitli.gani@gmail.com |
जितणे | - | जिंकणे. |
निशिदिनी | - | अहोरात्र. |
शतघ्नी | - | एक प्रकारची तोफ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.