A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सैराट झालं जी

अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहिलीच तरणी ही लाज

अगं झणाणलं काळजामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी

बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरू न्यारं

आलं मनातलं ह्या व्हटामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी

कवळ्यापणात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या
भरलं तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सूर सनईचं राया, सजलं

सजलं, ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं, मन हळदीनं राणी रंगलं
सरलं, हे जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं, नजरंनं विष जहरी भिनलं
अगं धडाडलं ह्या नभामंदी
अन् ढोलासंगं गात आलं जी
सैराट झालं जी

आक्रीत घडलंया
सपान हे पडलंया
गळ्यामंदी सजलंया डोरलं
साताजल्माचं नातं
रुजलंया काळजात
तुला रं देवागतं पुजलं

रुजलं, बीज पिरतीचं सजणी रुजलं
भिजलं, मन पिरमानं पुरतं भिजलं
सरलं, मन मारून जगणं सरलं
हरलं, ह्या पिरमाला समदं हरलं
आता कडाडलं पावसामंदी
अन् आभाळाला याद आलं जी