A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सजण सिपाई परदेसी

करुगत काई सुचंना ग बाई
सजण सिपाई परदेसी बाई ग

रातभर जाग
चांदन्‍याची आग
जाळी सर्व अंग पाहु कैसी बाई ग

नित्‌ सांडताती
आसवांचे मोती
डोळियाच्या शिंपी तुझ्या पायी बाई ग

तुजविण माझा
जीव जाई राजा
झुरते उदासी तुझी दासी बाई ग
गीत - योगेश
संगीत - राम कदम
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - सख्या सजणा
गीत प्रकार - लावणी, चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.