A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सजणा कशासी अबोला

सजणा, कशासी अबोला?
घडला असा रे माझा काय गुन्हा?

छळितो मजसी हा दुरावा, ध्यास तुझा जुलमी!
मोहरली वसुधा तरी का सावन हा विरही?
नवरंगी पुकारि माझि साद तुला
नवरंगी पुकारी साद तुला!

भास तुझा फुलवी सुखाचा पारिजात हृदयी
आस मनी झुरते अनोखी व्याकुळल्या समयी
रतिरंगी बुडालि अशि चंद्रकला
रतिरंगी बुडाली चंद्रकला!
गीत- वंदना विटणकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल
गीत प्रकार - भावगीत
वसुंधरा (वसुधा) - पृथ्वी.