A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साजणि बाई सजवी मजसी

साजणि बाई । सजवी मजसि करि घाई ।
लगीनघडि जाई । वेळ आली भरा ।
देव आले घरा । करी चतुराई ॥

साजणि बाई । नटुनि थटुनि लवलाही ।
निघतें अगाई । राजराजेश्वरा ।
जवळिं याहो जरा । बघिन मुख कांहीं ॥

साजणि बाई । चपळ पळत मन पांही ।
जवळ नच राही । मंगलाचे सडे ।
टाकि चोंहींकडे । दावि नवलाई ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - मास्टर दीनानाथ
स्वर- मास्टर दीनानाथ
नाटक - राजसंन्यास
चाल-साजन होरे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
लवलाही - लवकर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.