A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखी बघ अघटित

सखी बघ अघटित घडले ग
स्वप्‍नामधल्या निशिगंधाची अवचित हो‍ऊन गेले ग!

मजला काहि न कळले ग
संथ शांत ह्या सरितेचे जळ, आज खळाळून उठले ग!

वादळ वारे सुटले ग
श्रावण मेघापरी बरसला, सचैल पुरती न्हले ग!

गगन धरेवर झुकले ग
सुध बुध सारी राधे परि मी, पुरती हरवून बसले ग!

तेज रवीचे झरले ग
पान पान ह्या माणलतेचे, लाज लाजुनी लवले ग!
गीत- इंदिरा कुलकर्णी
संगीत - गजानन वाटवे
स्वर -
गीत प्रकार - भावगीत