घायाळाची मर्मवेदना घायाळास कळे ग !
रत्नपारख्याविण रत्नांची कुणा न पारख ठावी
शूलावर मम शेज सखे जर, नीज कशी मज यावी?
गगनमंडळीं शेज प्रियाची : मीलन मग कोठें ग?
फिरतें वणवण जखमी होउन, वैद्य कुणि न भेटे ग
मीरेची संपेल व्यथा जर हरीच वैद्य मिळे ग !
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | शोभा जोशी |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
शेज | - | अंथरूण. |
शूल (सूळ, शूळ) | - | वेदना / सूळ. अपराध्यास शासन करण्यासाठी उभा केलेला तीक्ष्ण टोकाचा लोखंडाचा स्तंभ. |
मंगेश पाडगांवकर यांची ही रचना संत मीराबाई यांच्या खालील रचनेवर आधारित आहे-
हे री मैं तो प्रेम-दिवानी मेरो दरद न जाणै कोय
घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय
जौहरि की गति जौहरी जाणै, की जिन जौहर होय
सूली ऊपर सेज हमारी, सोवण किस बिध होय
गगन मंडल पर सेज पिया की किस बिध मिलणा होय
दरद की मारी बन-बन डोलूँ बैद मिल्या नहिं कोय
मीरा की प्रभु पीर मिटेगी, जद बैद सांवरिया होय
सखि मी दर्ददिवाणी : माझी व्यथा कुणा न कळे ग
घायाळाची मर्मवेदना घायाळास कळे ग
रत्नपारख्याविण रत्नांची कुणा न पारख ठावी
शूलावर मम शेज सखे जर, नीज कशी मज यावी?
गगनमंडलीं शेज प्रियाची: मीलन मग कोठें ग?
फिरलें वनवन जखमी होउन, वैद्य कुणि न भेटे ग
मीरेची संपेल व्यथा जर हरीच वैद्य मिळे ग
सखि मी दर्ददिवाणी : माझी व्यथा कुणा न कळे ग
(संपादित)
मंगेश पाडगांवकर
'मीरा' या पुस्तकातून.
सौजन्य- मौज प्रकाशन गृह, मुंबई
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.