A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सख्या हो आज मला सावरा

मर्जी तुमची मी सांभाळीन, हृदयी द्या आसरा
सख्या हो, आज मला सावरा!

स्वप्‍नांचा हा मंचक सजला
धुंद सुगंधी होऊन भिजला
राहू कशी मी दूर साजणा
जवळी घ्या ना जरा
सख्या हो, आज मला सावरा!

हळू जरासा घाला विळखा
जीव होऊ दे हलका हलका
गोड गुलाबी उठता काटा
मोहरले दिलवरा
सख्या हो, आज मला सावरा!

चालू कशी मी बोलू कशी मी
मनातले मन खोलू कशी मी
मुकी असूनही गाते गाणे
माझ्या गुलमोहरा
सख्या हो, आज मला सावरा!
दिलवर - शूर / धाडसी.