A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
समजावुनी व्यथेला समजावता

समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली.. निघून गेली..
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले?

चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता न आले !
गीत - सुरेश भट
संगीत - रवि दाते
स्वर- सुरेश वाडकर
गीत प्रकार - भावगीत
तृषा - तहान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.