A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
समयासी सादर व्हावें

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥१॥

कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।
कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥२॥

कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा ।
कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥३॥