सांग कधी कळणार तुला
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणार्या फुलातला
गंधित नाजुक पानांमधुनी
सूर छेडिते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला
धुंदणार्या सूरातला
निळसर चंचल पाण्यावरती
लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला
नाचणार्या जलातला
जुळता डोळे एका वेळी
धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला
दोन वेड्या जिवातला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणार्या फुलातला
गंधित नाजुक पानांमधुनी
सूर छेडिते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला
धुंदणार्या सूरातला
निळसर चंचल पाण्यावरती
लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला
नाचणार्या जलातला
जुळता डोळे एका वेळी
धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला
दोन वेड्या जिवातला
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | अपराध |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |