A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग ना मला गडे

सांग ना मला गडे, जायचे कुणीकडे?

सुटे सुगंधीत वसंत वारे
तरंगती वर प्रीतपाखरे
धुके पांढरे पडे तयांतुन जायचे तुला-मला पुढे

गगन शीरावर, पायी धरणी
सदा तरुण मी, तू चिरतरुणी
प्रश्‍न का तुला पडे जायचे असे सुखातुनी सूखाकडे

ज्यास न शेवट-विश्रांतीस्थळ
प्रीती म्हणजे मार्गच केवळ
तरी आवडे असे जायचे सदा सुखातुनी सूखाकडे

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. वसंतराव देशपांडे, सुमन कल्याणपूर