A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोनियाच्या शिंपल्यात

सोनियाच्या शिंपल्यात गावला ग चिंतामणी
दिला जिवंत प्रसाद काय देवाची करणी

माझ्या अभाग्याच्या घरी आज नांदते गोकुळ
रांगतो ग नामा माझा गोकुळीचा घननीळ

तोंडाने बोबड्याला, ह्याला कळे सारे काही
टाळकरी पाषाणाचे नाम विठ्ठलाचे गाई

विठ्ठलाच्या देवळात नेई नैवेद्याची खीर
याच्या हट्टासाठी सये जेवले ग यदुवीर

 

Print option will come back soon