A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग प्रिये तुज काय

सांग प्रिये तुज काय हवे ते?
मम हृदयाची तूच स्वामिनी
काय हवे तुज सांग नवे?

तू तेजाची मूर्त देवता
वीरश्रीची समूर्त माता
होईल दशरथ त्रिभुवनपालक
प्रिय कैकेयी तुझ्यासवे
गीत - शांताराम नांदगांवकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - कैकेयी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.