तुझ्या स्नेहा पात्र मी नसें आतां । व्यर्थ माझी वाहसी मनीं चिंता ॥
| गीत | - | गो. ब. देवल | 
| संगीत | - | गो. ब. देवल | 
| स्वर | - | बालगंधर्व | 
| नाटक | - | शापसंभ्रम | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
सुप्रसिद्ध व सर्वमान्य अशा बाण कवीच्या सुरस कादंबरींतील कथानकाच्या आधारानें हें रचिलें आहे. इंदूरस्थ विद्वान् परीक्षकांच्या व महाराजांच्या जसें हें, पसंतीस उतरलें, तसेंच महाराष्ट्रीय रसिकजनांच्या आदरास पात्र झालें ह्मणजे मी कृतज्ञ झालों.
या नाटकांतील बहुतेक पद्यें संगीतप्रिय रसिकांस सहज ह्मणतां यावींत, म्हणून तीं मीं मुद्दाम सर्वांच्या श्रवणपरिचयांतील व आवडीच्या अशा चालींवर रचिलीं आहेत. तथापि एका पद्यास दुसर्याही चाली लागतात; त्या समय व रस मनांत आणून लावणें हें गानकुशल पात्रावरच सर्वस्वी अवलंबून आहे.
(संपादित)
गोविंद बल्लाळ देवल
'शापसंभ्रम' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- हरि नारायण गोखले (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 इतर संदर्भ लेख
  इतर संदर्भ लेख दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !