A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग सांग नाव सांग

सांग सांग सांग सांग
काय रं?
तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव

नाव सांग सांग सांग, गाव सांग !
चाललीस तुरुतुरु, अढी नगं मनी धरू
सांग सांग सांग, नाव सांग !

जा रं !
गोडंवानी नगं हसू, नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब, जरा थांब !

व्हट उघडुन सखू माझ्यासंगं तू बोल
शब्दाशब्दाला घे मोत्यापवळ्याचं मोल
तुझ्या मागं मागं आलो, तुझ्यापायी येडा झालो
नाव सांग सांग सांग, गाव सांग !

नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपून जपून तालेवाराची लेक
तुझ्या डोळियाचं बाण, झाला कासावीस प्राण
नाव गाव नगं पुसू थांब थांब थांब !

चाललीस तुरुतुरु
गोडंवाणी नगं हसू
अढी नगं मनी धरू
नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थांब !
नाव सांग सांग सांग, गाव सांग !
जरा थांब थांब थांब, जरा थांब !
घोडं बांध बांध बांध, घोडं बांध !