A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांगते ऐका पैशाला दोन

सांगते ऐका, पैशाला दोन बायका !

एकीचं नाव सत्ता
दुसरीचं नाव चिंता
पैशाच्या दोन कांता
त्याच्यासंगं इमान राखिती, दुसर्‍याला धोका !

पैशाच्या संसाराची
चिंता पैशाची दासी
चिंतेच्या पडता पाशी
जितेपणी ती चिता जाळिते, मरणाआधी कैका !

सत्तेचे न्यारे फंद
नीतीचे तुटती बंध
डोळ्यांमध्ये चढते धुंद
दमडीसाठी चमडी गमविन, गाठी बांधिन पैका !

पैशाच्या मोहापायी
किती रडती ठाई ठाई
किती झुरती ठाई ठाई
दाम येईना कामा काही, अडता माझी नौका !
गीत - पु. ल. देशपांडे
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर- आशा भोसले
चित्रपट - दूधभात
गीत प्रकार - चित्रगीत
कांता - पत्‍नी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.