संसार हा सुखाचा
संसार हा सुखाचा, मी अमृतात न्हाते
माझ्या मनात कोणी अंगाई गीत गाते
तू देवरूप माझे मी, एकरूप झाले
हिंदोळते उरी मी, मन मोहरून आले
वात्सल्य आणि प्रीती जुळले नवीन नाते
वेलीवरी कळीचे झाले फुलुनी फूल
येता सुगंधवारा पडली तिलाच भूल
दारातल्या तरूला फळरूप आज येते
या भावरम्य लाटा, हा सागरी किनारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
मज वेगळेपणाचे अपरूप आज वाटे
माझ्या मनात कोणी अंगाई गीत गाते
तू देवरूप माझे मी, एकरूप झाले
हिंदोळते उरी मी, मन मोहरून आले
वात्सल्य आणि प्रीती जुळले नवीन नाते
वेलीवरी कळीचे झाले फुलुनी फूल
येता सुगंधवारा पडली तिलाच भूल
दारातल्या तरूला फळरूप आज येते
या भावरम्य लाटा, हा सागरी किनारा
होता तसाच आहे हा आसमंत सारा
मज वेगळेपणाचे अपरूप आज वाटे
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | घरची राणी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अपरूप | - | दुर्मिळ / अद्भूत. |
हिंदोल (हिंडोल) | - | झुला, झोका. |