A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संसार-मंदिरी या आता उणे

संसार-मंदिरी या, आता उणे न काही
आनंद नाचतो ग, आनंद गीत गाई

झाले सुवासिनी मी, हातात राज्य आले
गृहिणीपदावरी मी सार्‍या सुखात न्हाले
ही ठेव वैभवाची नांदे दिशांत दाही

या श्याम-मंजिरीचा वृंदावनी पिसारा
दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा
हे झाड अंगणी या रखवालदार राही

पतिरूप देव माझा सिंहासनी विराजे
गालात हासते मी, डोळ्यांत प्रीत लाजे
भाग्यास आज माझ्या उपमा सुचे न काही
श्याम-मंजिरी - तुळस.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.